CULTURAL EVENTS


Kamgar Urban Drama Festival:

Continuing since 1953, this labour theater has given recognition to many theatrical artists as a platform / art band. At the seven divisional levels of the board, the first and second prizes is being awarded in the primary labour drama festival are selected for the final state level labour drama competition. The tournament features the best team awards as well as individual awards. The presentation of the cost to the theater teams, the minimum cost of travel, the basic equipment required for the play is provided by the Board.


Industrial and commercial workers drama festival:

The Board has decided to hold a separate theater competition for industrial and commercial workers from the year 2006. In this state-level competition, a drama organization of industries and establishments under the Labour Welfare Fund Act, 1953, participates in this competition.


Women's Drama Festival:

To achieve the potential of the dormant arts among women and to develop their masterpieces, the Board organizes a women drama festival at 18 Circle levels in the state.


Balnatya Festival:

To find the potential of the children and provide the platform available at the appropriate time by looking at their skills.
The Bal natya festival is organized at the Circle level on behalf of the board.


Open concert / splash competition:

This competition is organized with the intention of keeping the memory of the revolution day of August 9th. In the second fortnight of the month of July, the primary competition is held at 18 Circle offices and the state level competition is held on the 9th of August. 


State level labour Bhajan training camp:

Workers Bhajan training camps are organized every year on behalf of the Board in order to inform the workers and the workers families about the various types of hymns, as well as a proper understanding of the art of singing, music and how to make the hymns more popular among the messes.


State level Bhajan competition:

On the occasion of the anniversary of the Father of our nation,“Mahatma Gandhi” "Primary Labour Bhajan Competition” is organized in two sections, for men and women which is held annually in the month of October at the level of the 18 Circle offices of the Board in the State. The first prize winner of this competition participates in"State Level Contest", which held on two days, i.e. January 29 and 30, 


Folk dance:

A folk-dance competition is organized every year at the level of 18 Circle offices of the Maharashtra Labour Welfare Board, to inform the new generation about Indian folk art, to get an understanding of the various traditional dances together and to achieve the national unity through the competition. The state level tournament is organized for those teams who came first in the primary competition.




सांस्कृतिक कार्यक्रम


कामगार नागरी नाट्य महोत्सव:

सन १९५३ पासून अखंडपणे सुरू असलेल्या या कामगार नाट्यस्पर्धेने आजपर्यंत अनेक नाट्यकर्मिंना व्यासपीठ/ कलावंत म्हणून ओळख मिळवून दिलेली आहे. मंडळाच्या सात विभागीय स्तरावर प्राथमिक कामगार नाट्यमहोत्सव स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त नाट्य संधाची अंतिम राज्यस्तरीय कामगार नाट्य स्पर्धेकारिता निवड केली जाते. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सांघिक पारितोषिकांबरोबरच वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतात. नाट्यसंघांना सादरीकरण खर्चकमीत कमी दराचा प्रवासखर्चनाटकासाठी लागणारी प्राथमिक साधनसामग्री मंडळाकडून देण्यात येते.


औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य महोत्सव: 

औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी मंडळाने सन २००६ पासून स्वतंत्र नाट्यस्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत येत असलेले उद्योग आणि आस्थापना यांच्या नाट्यसंघाना या स्पर्धेत सहभागी होता येते.


महिला नाट्य महोत्सव:

महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावे, याकरिता मंडळाच्या वतीने राज्यातील १८ गटस्तरांवर महिला नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.


बालनाट्य महोत्सव:

मुला-मुलांमथील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कलागुण हेरून त्यांना योग्य वेळी व्यासपीठ उपलब्ध करुन देणेयादृष्टीने मंडळाच्या वतीने बालनाट्य महोत्सवाचे आयोजन गट स्तरावर करण्यात येते.


खुली समरगीत / स्फुर्तीगीत स्पर्धा:

९ आँगस्ट १९४२ क्रांती दिनाची स्मृती चिरंतन रहावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. माहे जुलै महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात १८ गट कार्यालयांच्या ठिकाणी प्राथमिक स्पर्धा ठेवण्यात येते आणि दिनांक ९ आँगस्ट रोजी क्रांतीदिनी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होते.


राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबिर:

कामगार व कामगार कुटुंबियांना भजनाच्या विविध प्रकारांची माहिती व्हावी तसेच गायनवादन याबाबत शास्रोक्त आकलन व्हावे व भजनातून समाजप्रबोन कसे करावे याची माहिती व्हावी या दृष्टीने मंडळाच्या वतीने कामगार भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रतिवर्षी धार्मिक स्थळी करण्यात येते.


राज्यस्तरीय भजन स्पर्धा:

राज्यातील मंडळाच्या १८ गट कार्यालयांच्या स्तरावर प्रतिवर्षी माहे ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त "प्राथमिक कामगार भजन स्पर्धा" पुरूष आणि महिला अशा दोन विभागात योजित करण्यात येते. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेता भजन संघाची "राज्यस्तरीय स्पर्धा" राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी (हुतात्मा दिन) दिनांक २९ व ३० जानेवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात येते.


लोकनृत्य स्पर्धा:

भारतीय लोककलेची नव्या पिढीला माहिती व्हावीविविध पारंपारिक नृत्ये एकत्रित पाहता यावीत  तसेच कलावंतांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व स्पर्धेच्या माध्यमातून राट्रीय एकात्मता जोपासली जावी या उद्देशाने महाराष्ट्रातील मंडळाच्या १८ गट कार्यालयांच्या स्तरावर प्रतिवर्षी  लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्राथमिक स्पर्धेत प्रथम आलेल्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येते.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation