LITERARY PROGRAM


Labour Literacy Meet:

Labour Literary Meeting was started by the Board since 1992 as an important platform for the budding labour writers / poets / literary and general public working for the artistic profession. The first labour literary convention was held in Pune under the chairmanship of Kabivarya Padma Shri Narayan Surve. Literature seminars include programs like Sahitya Dindi, Literature Exhibitions, Seminars of Honorable Speakers on various promotional topics, Storytelling, Poets Meeting of Invitations, Poets Meeting of budding workers poets etc. are also held.


Labour Literature Writing Contest:

This competition is organized by the Board to showcase the literary skills of the workers. These include story (Hari Narayan Apte Award), Kavita (Narayan Surve Award), Kadambari (Annabhau Sathe Award), Conceptual Writing (Lokhitvadi Award), Drama (Mama Barekar Award), Ekankika (G. Tri Madakholkar Award). Is taken. The winning contestants are honored at the Labour Literature Summit.


Poets Meeting:

A poet meeting is organized at the Circle level with the aim of promoting the literary arts of the workers. In the same way, a forum is organized through the poets meeting of the celebrated poets and are invited in the poets conferences.
साहित्य विषयक कार्यक्रम


कामगार साहित्य संमेलन:

साहित्यविषयक कलागुण जोपासणाऱ्या नवोदित कामगार लेखक / कवी / साहित्यिक आणि सर्वसाधारण कामगार वर्ग यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून सन १९९२ पासून कामगार साहित्य संमेलन हा उपक्रम मंडळाने सुरू केला. पहिले कामगार साहित्य संमेलन कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाले. साहित्य संमेलनात साहित्य दिंडीसाहित्य विषयक प्रदर्शनविविध प्रबोधनात्मक विषयावर मान्यवर वक्त्यांचे परिसंवादकथाकथननिमंत्रितांचे कवी संमेलननवोदित कामगार कवीचे कवी संमेलन आदि कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.


कामगार साहित्य लेखन स्पर्धा:

कामगारांच्या साहित्यिक कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळाच्या वतीने सदर स्पर्धा आयोजित केली जाते. यात कथा (हरी नारायण आपटे पुरस्कार)कविता (नारायण सुर्वे पुरस्कार), कांदबरी (अण्णाभाऊ साठे पुरस्कार)वैचारिक लेख (लोकहितवादी पुरस्कार)नाटक (मामा रेरकर पुरस्कार)एकांकिका (ग. त्र्य. माडखोलकर पुरस्कार) अशा सहा विभागात स्पर्धा घेण्यात येते. कामगार साहित्य संमेलनात विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येते.


कवी संमेलन:

कामगारांच्या साहित्य विषयक कलागुणांना चालना मिळावी या उद्देशाने गटस्तरावर कवी संमेलनाचे आयोजन केले जाते. तसेच कामगार साहित्य संमेलनात नवोदित कामगार कवीचे कवी संमेलन व निमंत्रित कवी संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.


साहित्य प्रकाशन अनुदान योजना:

कामगारांच्या साहित्य विषयक सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांच्याकडून चांगले साहित्य निर्माण व्हावे या उद्देशाने सदर योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कामगारांच्या प्रकाशित साहित्यासाठी रुपये १० हजार अनुदान दिले जाते.

All Schemes

  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...
  • ...

Navigation